पुणे

“मी शंकर, तू पार्वती!” म्हणत महिलेवर अत्याचार | भोंदू धर्मगुरूचा घृणास्पद प्रकार उघड….”

वसई आणि पुण्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे…
स्वतःला “महादेवाचा अवतार” म्हणवणाऱ्या एका भोंदू धर्मगुरूने 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणात आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, 2023 मध्ये फेसबुकवरून आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाली. महिलेच्या धार्मिक श्रद्धेचा फायदा घेत “अध्यात्म शिकवतो” असे सांगून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली.
यानंतर डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला…

“मी शंकर आहे, तू माझी पार्वती आहेस” असे सांगत महिलेची फसवणूक केली…
तिला मांजरी येथील लॉजमध्ये नेऊन गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मे 2025 मध्ये वसईमध्ये पुन्हा भेटायला बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, अशा प्रकारचे इतर प्रकरण उघड झाल्यानंतर पीडित महिलेने धाडस करून आपल्या पतीला सर्व सांगितले आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
धर्मगुरूच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या या प्रकारामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
आता या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…