पुणे

पार्थ पवार यांना क्लीन चीट की अटकेची टांगती तलवार? सत्य काय?

मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
या प्रकरणी खरगे समितीचा जंबो अहवाल विधीमंडळात सादर करण्यात आला आहे. सुमारे साडेचार हजार पानांच्या या अहवालात जमीन खरेदीत अनियमितता झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे.
या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अहवालात त्यांना थेट दोषी ठरवलेलं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पण याचदरम्यान RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा दावा केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अजून कारवाई होऊ शकते आणि पार्थ पवार यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.
कुंभार यांनी असंही म्हटलं आहे की, सध्या कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, पुढील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावंही समोर येऊ शकतात.
अहवालात महसूल आणि नोंदणी विभागातील काही अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
दरम्यान, फौजदारी गुन्ह्यांबाबत निर्णय घेणं हे समितीच्या कार्यक्षेत्रात नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील कारवाई पोलिसांकडून होणार आहे.
आता या प्रकरणात पुढे काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.