सांगली हादरली! पित्याच्या शिक्षेमुळे मुलीचा मृत्यू, दुसरी गंभीर

Rokhthok Maharashtra 18 0

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

चोरीच्या संशयातून एका पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना कठोर शिक्षा दिली.
या घटनेत 10 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,
तर 13 वर्षांची मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

ही घटना आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घडली.
दादू यमगर असं आरोपी पित्याचं नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या संशयावरून संतापलेल्या पित्याने हा प्रकार केला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

👉 अशा घटनांमुळे समाजात मोठी चिंता व्यक्त होत असून,
लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.