पुणे

पुण्यात धक्कादायक हत्या…चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून !

पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे…
बिबवेवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
मृत महिलेचे नाव सारिका घोडके… वय अवघं 23 वर्षे.आरोपी पती शुभम घोडके – व्यवसायाने पानटपरी चालक.
माहितीनुसार, पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.
याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.24 मार्च रोजी दुपारी पुन्हा एकदा वाद झाला…
आणि रागाच्या भरात शुभमने नियंत्रण गमावलं…
घरातील धारदार शस्त्र उचलून पत्नीवर सपासप वार केले.
गंभीर जखमी झालेल्या सारिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
सुरुवातीला 307 चा गुन्हा दाखल होता… आता 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत…
आणि एका संशयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे…