पुणे

मोबाईल डेटा पाहून पोलिसही हैराण | 2500 नंबर कोडवर्डमध्ये | मोठा खुलासा…..!

नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत… आणि आता तर पोलिसही चक्रावून गेलेत!
एसआयटी चौकशीचा आज बारावा दिवस… काल तब्बल पाच तास खरातची कसून चौकशी करण्यात आली. पण मोठा धक्का बसला तो त्याच्या मोबाईलमधील डेटामुळे!
पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर ‘कोडवर्ड’मध्ये सेव्ह असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच कोण कोणाशी संपर्कात होतं, हे उलगडणं अधिकच कठीण झालं आहे.
इतकंच नाही… प्रभावशाली व्यक्तींची नावं ‘डमी’ नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. तर पीडित महिलांचे नंबर मोबाईलमध्येच नाहीत! त्यांच्याशी संपर्कासाठी वेगळाच फोन वापरला जात होता, अशी माहिती समोर येतेय.

दरम्यान, न्यायालयाने Ashok Kharat याची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. कारण आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे महिलांना गुंगी आणण्यासाठी काही पदार्थ दिल्याचा संशय… पेढे आणि कडवट पाणी दिल्यानंतर महिलांना चक्कर येत होती, असा आरोप आहे. यामागे नेमकं काय होतं? याचा तपास सुरू आहे.
तसेच खरातने कमावलेली संपत्ती, त्याचे आर्थिक व्यवहार, आणि त्याला मदत करणारे इतर लोक यांचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची झळ आता Rupali Chakankar यांनाही बसली आहे. खरातसोबतच्या संबंधांमुळे त्यांनी आधीच पदांचे राजीनामे दिले आहेत. आता त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येतेय.
या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकमधील हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गूढ आणि गंभीर बनत चाललं आहे.
या प्रकरणात आणखी कोणते मोठे खुलासे होणार? कोणत्या मोठ्या नावांचा उलगडा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.