पुण्यातील धक्कादायक गुन्ह्यात आता नवे खुलासे समोर येत आहेत. स्वतःला महादेवाचा अवतार सांगणारा Rishikesh Vaidya याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडित महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं सांगत ती त्याची ‘पार्वती’ असल्याचा दावा केला.
डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला आणि महिलेला मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिथे तिला मादक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नाही, तर आरोपीने त्या महिलेचे फोटोही काढल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक घटना वसईमध्ये घडली. बैठकीदरम्यान पीडितेच्या पतीने संतापाच्या भरात आरोपीवर हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या ‘आमची वसई’ संस्थेच्या सदस्यांनाही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात एनसी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
महत्त्वाचं म्हणजे, पुणे पोलिसांनी सापळा रचत पिंपरी भागातून Rishikesh Vaidya याला अटक केली आहे. तो नातेवाईकांकडे जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
आता आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाणार असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
