पुणे

पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प | महापालिकेच्या कामामुळे नागरिक हैराण

पुण्यातील Hadapsar परिसरात सोमवारचा दिवस वाहनचालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरला.
Pune–Solapur Highway वर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा फटका बसला. सकाळच्या गर्दीच्या वेळी उड्डाणपूल असो किंवा खालचे रस्ते—सगळीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

रामटेकडी, वैदुवाडी, Magarpatta चौक, महात्मा गांधी चौक, मांजरी फाटा ते शेवाळवाडीपर्यंत संपूर्ण परिसर ट्रॅफिकने जाम झाला होता.
या सगळ्यात भर पडली ती महापालिकेच्या कामामुळे… जनसेवा बँकेसमोर रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा करून काम सुरू केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
पादचाऱ्यांना चालायलाही जागा नव्हती, तर वाहनचालकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागलं. पेट्रोलचा अपव्यय आणि वेळेचा मोठा तोटा नागरिकांना सहन करावा लागला.
दरम्यान, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था बिकटच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांचा सवाल आहे—लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमकं काय करतंय? हा प्रश्न सोडवला नाही तर आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.