पुणे

“10 हजारात मुलीची मागणी? अकोला पोलिसांचा संतापजनक प्रकार |

अकोल्यात पोलिसांकडून संतापजनक प्रकार! 🚨
महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे — “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”… पण अकोल्यात घडलेली घटना या ब्रीदवाक्यालाच काळीमा फासणारी ठरली आहे.
👉 अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपी महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला.
👉 आरोप असा की, ASI राजेश जाधव यांनी त्या महिलेला तिच्या मुलीबद्दल अश्लील मागणी केली.
💬 “तुझ्या मुलीला १० हजार देतो… एक रात्र माझ्याकडे पाठव” — असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.

👉 ही बाब समोर येताच अनिल जुमळे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत संताप व्यक्त केला.
👉 या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
⚖️ सध्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
📌 प्रश्न एकच —
जिथे पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नाहीत, तिथे सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुठे?