पुणे

“घर नाही… जीव देऊ!” खराडीत बिल्डरविरोधात मोठं आंदोलन!

पुण्यातील खराडी परिसरात घर खरेदीदारांचा संताप उसळला आहे…
व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी भर उन्हात धरणे आंदोलन करत बिल्डरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सदनिकाधारकांचा आरोप आहे की, बिल्डर Arman Kothari आणि Siddhant Kothari यांनी जुलै 2024 मध्ये घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, जबरदस्तीने 95 टक्के रक्कम वसूल करूनही दोन वर्ष उलटून गेले, तरी घराचा ताबा मिळालेला नाही.
या प्रकरणात सुमारे 130 सदनिकाधारकांनी प्रत्येकी जवळपास 1.40 कोटी रुपये भरले असून, एकूण 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम अडकली आहे.

सोसायटीचे चेअरमन Kishorkumar Indure यांनी सांगितले की, प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे आणि कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
तर सचिव Dr. Supriya Patil यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांवर झालेल्या आर्थिक आणि मानसिक तणावाची वेदना व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकल्पावर 450 कोटींचे कर्ज घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
बिल्डरने प्रकल्प गहाण ठेवून कर्ज उचलल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
आमदार Bapusaheb Pathare यांनी आंदोलनस्थळी भेट देत पीडितांना पाठिंबा दिला आणि पोलिस प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सदनिकाधारकांनी इशारा दिला आहे की, येत्या 10 दिवसांत घराचा ताबा मिळाला नाही…
तर आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाईल.
आता प्रश्न एकच—
सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी अजून किती लढावं लागणार?