सावंतवाडी शहर हादरलंय एका अतिशय धक्कादायक घटनेने…
एकाच गल्लीत… काही तासांच्या अंतरात… दोन जणांनी टोकाचं पाऊल उचललं!
बिरोडकर टेंब परिसरात राहणाऱ्या १८ वर्षांच्या प्रांजलने दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतीच बारावीची परीक्षा दिल्यानंतर ती घरीच होती… पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
आणि धक्का इथेच थांबला नाही…
प्रांजलच्या घटनेनंतर काही वेळातच, २७ वर्षीय अभिजितनेही जवळच्या चिवार टेकडीवर जाऊन झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.
दोघेही एकाच परिसरातील… आणि काही तासांत घडलेल्या या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून, आत्महत्येमागचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे.
दरम्यान, अभिजितने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर येतेय…
त्या चिठ्ठीत काय आहे?
या दोन मृत्यूंचा काही संबंध आहे का?
याचा उलगडा आता तपासानंतरच होणार आहे…
