पिंपरी-चिंचवडमधील आळंदी परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षांची चिमुकली आणि 75 वर्षांच्या महिलेचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये धनश्री केदारी ही लहान मुलगी आणि संगीता शिंदे या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात काम करतात. त्या नाईट ड्युटीसाठी गेल्यामुळे त्यांनी नातीला शेजाऱ्यांकडे झोपायला ठेवले होते.
मात्र सकाळी परत आल्यानंतर दोघींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे कुटुंबावर मोठं दु:ख कोसळलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने बोथट वस्तूने हा खून केला असावा असा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे.
आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेa
