*काँग्रेस मैदानात! पोटनिवडणुकीत रंगणार तगडी लढत……..!”*

Rokhthok Maharashtra 18 0

मोठी राजकीय बातमी… राज्यातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत आता रंगत वाढणार!
काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय… आणि पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदीलही मिळालाय.
बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम नावांवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे… काँग्रेस मित्रपक्षांसोबत चर्चा करूनच उमेदवारांची घोषणा करणार आहे.

 

यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप आणि रणनीतीला वेग येणार असून, बारामती आणि राहुरीत तगडी लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, २३ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
आता प्रश्न एकच…
काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार?
आणि या लढतीत बाजी कोण मारणार?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.