*”PBKS वर BCCI ची मोठी कारवाई! श्रेयस अय्यरला 24 लाखांचा दंड | IPL 2026!”*

Rokhthok Maharashtra 18 0

IPL 2026 मध्ये विजय मिळवूनही पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. Punjab Kings संघावर BCCI ने कडक कारवाई केली आहे.
‘स्लो ओव्हर-रेट’ नियमाचे सलग दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्याने कर्णधार Shreyas Iyer यांच्यावर 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
फक्त कर्णधारच नाही, तर संपूर्ण प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयरलाही दंड बसला आहे. प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपये किंवा सामना फीच्या 25 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

दरम्यान, या सामन्यात Chennai Super Kings ने 209 धावा केल्या होत्या.
पण पंजाबने जबरदस्त खेळ करत अवघ्या 18.4 षटकांत सामना जिंकला.
विजय मिळवूनही आता पंजाबवर BCCI चा दंडाचा फटका बसलाय!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.