७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार. नराधम रामु निसादला बेड्या; आई-आत्याने रंगेहात पकडले

Rokhthok Maharashtra 23 0

“पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगरमध्ये एका ४० वर्षीय नराधमाने अवघ्या ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय!”
“रामु कुंजल निसाद असं या नराधम आरोपीचं नाव आहे. २ एप्रिलला त्याने मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना, पीडितेच्या आई आणि आत्याने त्याला खिडकीतून रंगेहात पकडले.”

 

“एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.