पुणे

विश्रांतवाडी एअरपोर्ट रोड बनला मृत्यूचा सापळा! भीषण अपघात, जबाबदार कोण?

विश्रांतवाडी एअरपोर्ट रोड… आता बनलाय मृत्यूचा सापळा?
पुण्यातील विश्रांतवाडी येथील एअरपोर्ट रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्ता क्रमांक ७ वर गेल्या तीन दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद… संपूर्ण परिसर अंधारात!
नागरिकांनी महापालिकेला वारंवार कळवूनही दुर्लक्ष…
आज पहाटेच फिगो कारचा भीषण अपघात — कारने जेलची भिंत फोडली, झाड आणि डिव्हायडरला जोरदार धडक!
कारमध्ये ५ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील आठवड्यातही याच रस्त्यावर अपघात…

गेल्या वर्षी दोन जणांचा मृत्यू…
आणि काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाचाही जीव गेला.
स्थानिक नागरिकांचा संताप वाढला आहे.
स्पीडब्रेकरची वारंवार मागणी… पण प्रशासन मात्र शांत!
शिवसेनेचे विभागप्रमुख शाम ताठे यांचा इशारा —
तात्काळ स्पीडब्रेकर बसवा
अन्यथा आंदोलन छेडले जाईल!
आता प्रश्न एकच —
अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?