नागपुरात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! पती बेपत्ता, विवाहितेवर अत्याचार |

Rokhthok Maharashtra 19 0

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर आता नागपूरमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पती बेपत्ता असल्यामुळे हवालदिल झालेल्या विवाहितेचा गैरफायदा घेत एका भोंदूबाबाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी ताहीर बेग याला पोलिसांनी अटक केली आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DW0lbbNgF27/

पूजा करून नवरा परत आणतो, असा बहाणा करत आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला.
इतकंच नाही, तर “देवाचा कोप होईल” अशी धमकी देत तोंड बंद ठेवण्यास भाग पाडलं.
मात्र पीडितेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली… आणि आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.