चिंचवडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.
DMartमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आकांक्षा डोलारे असं या तरुणीचं नाव असून, कामावर असतानाच तिने विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवस तब्येत बिघडल्याचं सांगत तिला थेरगाव महापालिका रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं… मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रेमप्रकरणातून आणि कुटुंबियांच्या विरोधामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
