पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या या ठिकाणीच रुग्णांना स्वच्छतेची कामं करायला लावली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
आरोग्य उपसंचालकांनी केलेल्या पाहणीत वॉर्ड क्रमांक 27 ची अवस्था अत्यंत खराब आढळली.
वॉर्डमध्ये उग्र वास, अस्वच्छता, ड्रेनेज ब्लॉक आणि स्वच्छतागृहात पाण्याचीही कमतरता होती.
काही रुग्णांना तुटलेल्या बेडवर झोपवण्यात येत होतं, तर काही ठिकाणी खिडक्याही नव्हत्या.
ही परिस्थिती जनावरांच्या गोठ्यापेक्षा वाईट असल्याचं चित्र समोर आलं आहे.
या प्रकरणी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र प्रश्न असा आहे…
ज्या रुग्णांना बरे होण्यासाठी इथे आणलं जातं, त्यांनाच अशी वागणूक का?
आता याकडे सरकार गंभीरपणे लक्ष देणार का?
