रूममध्ये नेऊन केली हत्या, बेड बॉक्समध्ये लपवला मृतदेह

Rokhthok Maharashtra 19 0

दिल्लीतील मंगोलपुरी भागात एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे.
२२ वर्षांच्या तरुणाने ३५ वर्षांच्या विवाहित महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे.
आरोपीचा त्या भागात चिकन शॉप आहे.
मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दोघे एका रूममध्ये गेले.
थोड्याच वेळात आरोपीचे काका आणि त्यांचा मित्र तिथे पोहोचले.
माहितीनुसार, तरुणाने महिलेवर दबाव टाकत अयोग्य मागणी केली, मात्र तिने नकार दिला.

यानंतर वाद वाढला.
रागाच्या भरात तरुणाने महिलेचा गळा आवळून हत्या केली
आणि मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला.
संध्याकाळी सातच्या सुमारास पीजी मालक घरी आला असता रूम उघडी होती.
आत पाहिल्यावर बेड बॉक्समधून पाय बाहेर दिसला,
आणि उघडल्यावर महिलेचा मृतदेह सापडला.
या प्रकरणात आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
मृत महिला विवाहित असून तीन मुलांची आई होती.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.