मुंबईतील पायधुणी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची चर्चा असताना फॉरेन्सिक अहवालाने तपासाला वेगळंच वळण दिलं आहे.
अहवालानुसार मृतांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याचं आढळलं आहे. डॉक्टरांच्या मते सामान्य अन्न विषबाधेमध्ये असे बदल सहसा दिसत नाहीत. त्यामुळे विषारी घटक किंवा घातपाताची शक्यता आता अधिक बळावली आहे.
विशेष म्हणजे मृत अब्दुल्ला डोकाडिया यांच्या शरीरात मोर्फिनचे अंशही आढळल्याची माहिती समोर आली आहे.
२५ एप्रिलच्या रात्री कुटुंबाने बिर्याणी खाल्ली आणि नंतर कलिंगड खाल्लं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उलट्या, जुलाब आणि चक्कर सुरू झाली. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला.
एफडीएने बिर्याणी, कलिंगड, पाणी, चिकन, मसाले अशा ११ नमुन्यांची तपासणीसाठी जप्ती केली आहे.
हा प्रकार अन्न विषबाधा आहे, औषधांचा रिऍक्शन आहे की घातपात?
याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
