Parth Pawar ची ‘वर्षा’वर गुप्त भेट! फडणवीसांसोबत 45 मिनिटं खलबतं, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

Rokhthok Maharashtra 13 0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालीय… कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.
विशेष म्हणजे… ही भेट रात्री उशिरा झाली आणि जवळपास पाऊण तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे पार्थ पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता नव्हता.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नियुक्तींवरून वाद सुरू आहेत. पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा आधीच रंगल्या होत्या… आणि आता पार्थ पवारांची ही गुप्त भेट अनेक प्रश्न निर्माण करतेय.
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे… ही फक्त साधी भेट होती? की महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथीची तयारी सुरू झालीय?
दरम्यान, या भेटीबाबत अजूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… पण राज्यात राजकीय चर्चांना मात्र जोर आलाय!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.