पुणे

स्वतःच्या मुलासाठी NEET पेपर फोडला? RCC संचालक मोटेगावकर CBIच्या जाळ्यात!

देशभर गाजणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय… लातूरमधील RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याने स्वतःच्या मुलासाठीच NEET पेपर फोडल्याचा संशय CBI ला आहे.
दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी सुनावली असून, चौकशीत मोठे पुरावे समोर येत आहेत.
CBI ने लातूरमधील त्याच्या घरावर छापा टाकला असता थेट ‘केमिस्ट्री’ विषयाची NEET ची मूळ प्रश्नपत्रिका जप्त केल्याची माहिती समोर आलीय.
तपासानुसार, NTA प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या प्रा. कुलकर्णी याच्याकडून ही प्रश्नपत्रिका मोटेगावकरपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे.

धक्कादायक म्हणजे… यावर्षी मोटेगावकरचा स्वतःचा मुलगाही NEET परीक्षेला बसला होता. मुलाला मेडिकलला प्रवेश मिळावा यासाठीच हा सगळा खेळ रचला गेला का? याचा तपास आता CBI करत आहे.
इतकंच नाही… प्रश्नपत्रिकेच्या जोरावर इतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.
आता पुढच्या ९ दिवसांत या पेपरफुटी रॅकेटमधले आणखी किती मोठे चेहरे समोर येतात… याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय!