पुणे

श्रीगोंद्यात गुंतवणूकदार महिलांचा संताप! एजंटला भरचौकात मारहाण |

“अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात गुरुवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
सिस्पे, इन्फिनिटी आणि बिकॉन या कंपन्यांच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे संतप्त झालेल्या महिला गुंतवणूकदारांनी एका एजंटला भरचौकात मारहाण केली.

शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून अनेकांचे आयुष्यभराचे पैसे अडकले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ औताडे अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांनी एजंटकडे पैसे परत मागितले असता,
‘औताडे सापडल्यानंतर पैसे देतो’ असे उत्तर मिळाल्याने संताप अनावर झाला.

यानंतर महिलांनी संबंधित एजंटला रस्त्यातच पकडून जोरदार मारहाण केली.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून,
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.”