पुण्यातील मावळ तालुक्यातील गहुंजे येथे गृहखरेदीदारांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे.
‘पेनिनसुला लॅन्ड लिमिटेड’च्या फेज-६ प्रकल्पात फ्लॅट बुक करून आणि कायदेशीर करारनामा होऊन तब्बल साडेतीन वर्षे उलटली, तरी अनेक ग्राहकांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी २०१९ मध्ये फ्लॅट बुक केले होते. रेरा आणि ॲग्रीमेंटनुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पझेशन देणे बंधनकारक होते.
दरम्यान, संतप्त झालेल्या ८० हून अधिक सदनिकाधारकांनी थेट साईट ऑफिसवर जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बिल्डरांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
