एल निनोचा मोठा फटका! मान्सून अडकला, महाराष्ट्रावर उष्णतेचं संकट |

Rokhthok Maharashtra 16 0

महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी! यंदा मान्सूनच्या आगमनात मोठा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचणारा मान्सून अद्याप दाखल झालेला नाही.
हवामान विभागानुसार, 11 जूनपर्यंत मुख्य मान्सूनबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. मात्र 3 जूनपासून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस व गारपीट धुमाकूळ घालू शकते.
दरम्यान, विदर्भात पुढील 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनचा प्रवास रखडल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.