जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या त्यागाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. भटक्या समाजातील पायल शिंदे आणि काजल शिंदे या दोन सख्ख्या बहिणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाईपद मिळवले आहे.
मजुरी करणारे वडील आणि पशुपालन करणारी आई… स्वतःची जमीन नसतानाही मुलींना शिक्षणासाठी कधीच कमी पडू दिले नाही. भरतीची तयारी व्हावी म्हणून घरातील टीव्ही चक्क पोत्यात बांधून ठेवण्यात आला. सहा बहिणींमध्ये एकच मोबाईल वापरत अभ्यास सुरू ठेवला.
मुंबई पोलिस भरतीत 20 वर्षीय पायलने 123 तर 19 वर्षीय काजलने 125 गुण मिळवत यश संपादन केले. आई-वडिलांच्या कष्टाला यशाची सलामी देणारी ही कहाणी आज हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
टीव्ही पोत्यात बांधला, एकच मोबाईल वापरला अन् दोन बहिणी झाल्या मुंबई पोलिस! प्रेरणादायी यशोगाथा
