हडपसर येथील डॉ. म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि “मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर यांच्या वतीने जागतिक पचन आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष निमित्ताने रुग्णांसाठी अत्याधुनिक GI “फिजिऑलॉजी अँड मोटिलिटी लॅब”चे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजित कोलटकर आणि जगदीप सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. चेतन म्हस्के यांनी या नवीन लॅबची संकल्पना आणि रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली.
पोटदुखी, अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, IBS, कोलन विकार आणि इतर पचनसंस्थेच्या आजारांचे अचूक निदान करण्यासाठी या लॅबमध्ये अत्याधुनिक तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डॉ. अजित कोलटकर यांनी हेलिकोबॅक्टर पायलोरी टेस्ट, लॅक्टोज इंटॉलरन्स टेस्ट, कॅलप्रोटेक्टिन टेस्ट, कोलनव्ह्यू FIT टेस्ट, स्टमक फंक्शन टेस्ट तसेच गॅस्ट्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी यांसारख्या तपासण्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
तर जगदीप सिंह यांनी या तपासण्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता, अचूकता आणि आधुनिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमधील महत्त्व यावर प्रकाश टाकला.
या उपक्रमाचे उपस्थित नागरिक, डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. पचनसंस्थेच्या आजारांचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार यासाठी अशा सुविधा समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“निरोगी पचनसंस्था – निरोगी जीवन” हा संदेश देत जागतिक पचन आरोग्य दिनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
हडपसरमध्ये अत्याधुनिक GI Lab चे उद्घाटन! पचनसंस्थेच्या आजारांसाठी नवी सुविधा – Dr. Mhaske Hospital
