पुणे

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप! कार आडवी लावून केला गोळीबार? धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

“धाड… धाड… धाड…! बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गोळीबाराचा आरोप केला आहे.
देशमुख यांचा दावा आहे की, धनंजय मुंडे यांनी कार आडवी लावून हवेत दोन राउंड फायर केले आणि त्यांना धमकावले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात ती घटना घडली नसल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांनंतर देशमुख यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य आढळले नसल्याची माहिती समोर आली आहे.
आता देशमुखांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.