“पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत.
सर्वात आधी, बीअर उत्पादन कंपनीतून तब्बल 36 लाख रुपयांच्या 10 स्टील स्टोअरेज टाक्यांची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी 600 जीबीहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे.
दुसरी धक्कादायक घटना निगडीत घडली. 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तर तिसऱ्या घटनेत, मोरवाडी ब्रिजखाली कार आडवी लावून एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
पिंपरी-चिंचवडमधील या तिन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.”
36 लाखांच्या टाक्यांची चोरी उघड! 600 CCTV तपासून आरोपी जेरबंद | निगडीत आत्महत्या, व्यावसायिकाला मारहाण
