LIC ला 347 कोटींचा झटका? राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणामुळे खळबळ | 15 लाख कोटींच्या व्यवहारांवर प्रश्न

Rokhthok Maharashtra 11 0

टेन्शन वाढलंय का? देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ला तब्बल 347 कोटी रुपयांचा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे!
राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीत LIC ची 10.80 टक्के हिस्सेदारी आहे. SEBI ने कंपनीचे प्रवर्तक राजेश मेहता यांच्यावर निधीच्या कथित गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही अहवालांमध्ये 15 लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे हा देशातील सर्वात मोठ्या आर्थिक वादांपैकी एक ठरू शकतो.
मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, LIC ची ही गुंतवणूक तिच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांच्या पैशांवर थेट धोका असल्याचे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.
तरीही हा प्रकार नेमका काय आहे? आणि LIC च्या गुंतवणुकीचे पुढे काय होणार? 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.