विरोधात काँग्रेसचा एल्गार! पुण्यात फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन

Rokhthok Maharashtra 19 0

पुण्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. काँग्रेसचे पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता पेठेतील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचा आरोप आहे की, राज्य सरकार सामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटर लादत असून यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट होणार आहे. तसेच महावितरणच्या जागेत अदानी कंपनीला कार्यालयासाठी जागा देण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, नागरिकांवर सक्ती करू नये आणि महावितरण परिसरातील अदानीचे कार्यालय हटवावे, अशा मागण्यांचे निवेदन महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्मार्ट मीटरबाबतचा हा वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता असून सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.