ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी बिघडवला शिंदेंचा गेम? ऑपरेशन टायगरवर मोठा प्रश्न!

Rokhthok Maharashtra 12 0

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.
ठाकरे गटाचा दावा आहे की, बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या 6 खासदारांपैकी दोन खासदार – ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील – यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सहीच केलेली नाही.
विशेष म्हणजे हे दोन्ही खासदार दिल्लीतील बैठकीलाही उपस्थित नव्हते. संजय दिना पाटील यांनी तर स्पष्टपणे सांगितले की, “मला शिंदे गटाकडून कोणतेही आमंत्रण आलेले नाही.”
दुसरीकडे, शिंदे गटाचा दावा आहे की त्यांचे “ऑपरेशन टायगर” यशस्वी झाले असून फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.
मात्र, जर दोन खासदारांनी खरोखरच पत्रावर सही केली नसेल, तर शिंदे गटाच्या रणनीतीला मोठा धक्का बसू शकतो.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.