पुणे

पुणे विद्यापीठाच्या मेसमध्ये धक्कादायक प्रकार! तुकाराम मुंढेंच्या आदेशाने FDA ची मोठी कारवाई

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर एफडीएने विद्यापीठाच्या सेंट्रल कॅन्टीनवर धडक कारवाई केली आहे.
तपासणीदरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन उघड झाले. कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, तापमान नियंत्रणाची व्यवस्था नसणे, स्वयंपाकघरात अस्वच्छता, पेस्ट कंट्रोलचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची नोंद नसणे अशा अनेक त्रुटी आढळल्या.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी करत होते. अन्नामध्ये अळी, कीड, कॉकरोच आणि माश्या आढळल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले होते.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत एफडीएने ‘श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे सेंट्रल कॅन्टीनसह आठही हॉस्टेल मेस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.