पोलिस चौकीत 20 लाखांचा डाव? | तोतया पत्रकार आशिष तिवारी अटक, 2 पोलिस कर्मचारी फरार

Rokhthok Maharashtra 35 0

पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडवणारे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नरहे येथील एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात आता तोतया पत्रकार आशिष तिवारी, राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री यांची नावे समोर आली आहेत.
तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लुटीची रोकड असलेली गाडी थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत नेण्यात आली होती. तिथे तब्बल 20 लाख रुपयांची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आहे.
हा प्रकार लक्षात येताच पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी तातडीने चौकीत धाव घेत रोकड आणि आरोपींना ताब्यात घेऊन नरहे पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय अहवालही समोर आला आहे.
या प्रकरणात एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आशिष तिवारीला अटक झाली आहे. तर प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री यांच्यासह इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.