रात्री 11 पर्यंत बैठका… सकाळी 7 ला रुग्णालयात! सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये
बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यशैलीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पाहणी करत त्यांनी प्रशासनाला कामाचा स्पष्ट संदेश दिला.
गुरुवारी रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सुनेत्रा पवार शुक्रवारी सकाळी नेमक्या सात वाजता बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या.
रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या या ‘ॲक्शन मोड’ची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
अनेक नागरिकांचे मत आहे की, या दौऱ्यामुळे विकासकामांना अधिक गती मिळेल आणि प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल. सुनेत्रा पवार यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश या दौऱ्यातून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.





