बाणेरमध्ये उघड्यावर सापडल्या वापरलेल्या सिरिंज; नागरिकांमध्ये भीती!

Rokhthok Maharashtra 4 0

पुण्यातील बाणेर परिसरात सेवा रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज आणि सुया आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी ड्रग्ज रॅकेटचा संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
बाणेर येथील सेवा रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या वापरलेल्या सिरिंज आणि सुया पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सुयांचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी झाला असावा, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
याआधीही बालेवाडीत ९८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करून तिघांना अटक करण्यात आली होती. तसेच बाणेरमधील एका पान दुकानावर अमली पदार्थ विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
बाणेर-बालेवाडी परिसरात शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि आयटी कंपन्या असल्याने नागरिकांनी सीसीटीव्ही तपासणी, रात्रीची गस्त वाढवणे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बाणेर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी या सिरिंज जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, परिसरात पोलिसांची गस्त वाढवली जाईल, अशी माहिती दिली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.