पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसलाही हादरा….. विजयसिंहांबरोबर आणि हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर?

पंढरपूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राज्याच्या राजकारणातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते अर्थात विजयसिंह मोहिते-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. या दोन्ही नेत्यांचा प्रवेश 17 एप्रिलच्या अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेत होईल अशी शक्यता सध्या भाजप सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघात विजयदादांचा आशीर्वाद आहे. त्यांच्याच सल्ल्याने माढा मतदारसंघात पुढची रणनीती आणि उमेदवार ठरेल अशा आशयाचे भाषण करून विजयसिंह देखील भाजपात प्रवेश करतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
गेल्या दोन दिवसांपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली. ही सभा अकलूज येथे होणार आहे. या सभेतच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंहांचा भाजपा प्रवेश होईल. विजयसिंहासोबतच माळशिरस तसेच सोलापूर जिह्यातील अनेक मातब्बर नेते ही भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
अशातच नुकतीच माजी सहकारमंत्री काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची विजयसिंह यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये विजयसिंह आणि हर्षवर्धन यांच्यात बंद खोलीत गुप्तगू झाल्याची माहिती आहे. इंदापूर तालुक्यात सध्या अजित पवारांच्या वर्चस्वामुळे हर्षवर्धन पाटलाची मोठी कोंडी होत आहे. अशातच आगामी विधानसभेच्या विचार करता हर्षवर्धन पाटील भाजपात येऊ शकतात. कदाचित यासाठीच विजयसिंह यांनी हर्षवर्धन पाटलांचे मन भाजपाच्या दिशेने वळविले आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
यामुळे येत्या 17 एप्रिलच्या अकलूज येथील सभेत विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश झाला. तर निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा हादरा समजला जाणार आहे.

0 0 votes
Article Rating
258 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments