हडपसर-मांजरी फाट्यावर ‘अफजलखानाचा वध’! छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत देखाव्यातून साकारला
हडपसर-मांजरी फाटा चौकात यंदा अफजलखानाचा वध! छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत देखाव्यातून साकारला
हडपसर-मांजरी फाटा चौकातील विठ्ठल नगर येथील श्री गणेश मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोखा जिवंत देखावा सादर केला आहे.
यावर्षी मंडळाच्या वतीने ‘अफजलखानाचा वध’ हा जिवंत देखावा साकारण्यात आला असून, या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांनी केलेला पराक्रम नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या देखाव्यामध्ये स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला असून, अफजलखानाची भेट, प्रतापगडावरील ऐतिहासिक प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अतिशय प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आला आहे.
या जिवंत देखाव्याचे उद्घाटन श्रीराम भक्त पंडित दादा मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनील दादा बनकर, भाजपा नेते नितीन तात्या होले, सतीश जगताप, आबासाहेब कोरडे, पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, आकाश आटोळे, सन्मित्र बँकेच्या संचालिका रेश्मा हिंगणे, मोडक यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. पारंपरिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सामाजिक संदेशाची जोड देत मंडळाने साकारलेला हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा जिवंत देखावा साकारण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल मारणे, कार्याध्यक्ष सचिन उर्फ बंडू मोरे, सचिन तांबे, प्रशांत गायकवाड, सुनील तांबे, सोमनाथ मोरे, राजेश देव आणि राजेश पवार, श्री थिटे, शुभम वीर, रितेश कांबळे, गौरव सोनार, सोनू गायकवाड, शुभम ठोंबरे, सिद्धार्थ थिटे, मनोज बाबा थिटे यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो समाजासमोर आणि विशेषतः युवा पिढीसमोर जिवंत स्वरूपात यावा, या उद्देशाने ‘अफजलखानाचा वध’ हा देखावा साकारल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मांजरी फाटा चौकातील हा ऐतिहासिक जिवंत देखावा सध्या गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.





