मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! सरकारला 90 दिवसांचा अल्टिमेटम; भल्या पहाटे नेमकं काय घडलं?
भल्या पहाटे मोठी घडामोड! मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण स्थगित केलं आहे. मात्र सरकारला थेट ९० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
बीडच्या पाटोदा येथे पहाटे सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस या शिष्टमंडळात होते. चर्चेनंतर जरांगेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र आंदोलन थांबणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच हैदराबाद गॅझेटनुसार समोर आलेल्या ५८ लाख नोंदी कमी होऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या ९० दिवसांत राज्यभर दौरा करून समाजात जनजागृती करणार असल्याचंही जरांगेंनी सांगितलं.
आता सरकारने दिलेली आश्वासने आणि पुढील तीन महिन्यांत होणारी कार्यवाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आणि सरकारने धोका दिला, तर पुन्हा मुंबई गाठू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! सरकारला 90 दिवसांचा अल्टिमेटम; भल्या पहाटे नेमकं काय घडलं?





