महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Rokhthok Maharashtra 10 0

महाराष्ट्रात पावसाची पुन्हा एन्ट्री! शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. कोरडवाहू भागातील पिकांवरही त्याचा परिणाम दिसून येत होता. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि लातूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
तर उद्याही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवसह अनेक भागात पावसाचा अंदाज आहे.
मुंबईतही आकाश अंशतः ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.