गोकुळनगर अतिक्रमण कारवाईत महिला-मुलाला मारहाणीचा आरोप! कॉन्ट्रॅक्ट सिक्युरिटीला मारहाणीचा अधिकार आहे का?
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान एका महिला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र शिवश्री उत्तमबापू कामठे यांनी महापालिका प्रशासनाला सवाल केला आहे.
महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेल्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना नागरिकांना, विशेषतः महिला आणि मुलांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? असा थेट सवाल उत्तमबापू कामठे यांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमणविरोधी कारवाई करणे हा प्रशासनाचा अधिकार आहे; मात्र कारवाई करताना नियमांचे पालन झाले पाहिजे. गोरगरीब नागरिकांवर अन्याय किंवा मारहाण सहन केली जाणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मारहाणीला जबाबदार कोण, त्या वेळी कोणते अधिकारी उपस्थित होते आणि कॉन्ट्रॅक्ट सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना असा अधिकार देण्यात आला होता का, याची माहिती प्रशासनाने जनतेसमोर द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





