३७ लाखांचा पगार सांगून फसवणूक? मॅट्रिमोनियल साइटवर बनावट प्रोफाइल!

Rokhthok Maharashtra 7 0

मॅट्रिमोनियल साइटवर ओळख, ३७ लाखांचा पगार अन् लग्नाआधी धक्कादायक अट! डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप
मुंबईत मॅट्रिमोनियल वेबसाइटवर ओळख झालेल्या तरुणाने डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी इंजिनिअर असल्याचे सांगत वर्षाला ३७ लाख रुपयांचा पगार आणि मुंबईत स्वतःचे घर असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने बनावट प्रोफाइल तयार केल्याचा आरोप आहे.
३० वर्षीय डॉक्टर तरुणीने लग्नाला होकार देण्यापूर्वी आरोपीने तिच्यासमोर अजब अट ठेवली. लग्नाआधी लैंगिक सुसंगतता तपासण्यासाठी एका ‘प्लेबॉय’ला भेटण्यास सांगितले. त्यासाठी त्याने स्वतःच मोबाइल नंबर दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेने त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण करून आरोपीला पाठवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने ज्योतिषाचा हवाला देत लग्नास नकार दिला.
तपासात डॉक्टरला भेटलेला ‘प्लेबॉय’ आणि बनावट आयटी इंजिनिअर प्रोफाइल तयार करणारा व्यक्ती एकच असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या प्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सुभाष सातपुते, वय ३४, याला नालासोपारा येथून अटक केली आहे.
आरोपीने अशाच प्रकारे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.