राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल संघटन मजबूत करण्यासह पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Rokhthok Maharashtra 6 0

फुरसुंगी : वडाचीवाडी गावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव लक्ष्मण बांदल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते बांदल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

वडाचीवाडी गावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना बांदल यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित विकासकामांना चालना दिली. स्थानिक पातळीवर काम करत असतानाच त्यांनी पक्ष संघटनेतही सक्रिय भूमिका बजावत संघटन वाढीसाठी योगदान दिले आहे.

नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे लक्ष्मण बांदल यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वतोपरी योगदान देणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

बांदल यांच्या नियुक्तीमुळे फुरसुंगी-वडाचीवाडी परिसरातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटो ओळ : शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना लक्ष्मण बांदल.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.