कराड वाहतूक शाखेची विशेष मोहीम; नियम तोडणाऱ्यांना दणका

Rokhthok Maharashtra 10 0

कराड शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कराड वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी राबवलेल्या या मोहिमेत ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाई करण्यात आली.ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालवणारे १४ वाहनचालक आढळून आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तसेच शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि नो-पार्किंग झोनमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ११ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच मद्यपान करून वाहन चालवल्याने होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशा मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कराड वाहतूक शाखेने सांगितले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.