शेवाळेवाडीच्या पाणी योजनेला गती! ₹36 कोटींची योजना, 25 किमी पाइपलाइनचे काम सुरू | राहुल शेवाळे
पुणे महानगरपालिकेच्या वतीने शेवाळेवाडी गावाला सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला आता गती आली आहे,
पुणे महानगरपालिकेच्या वतीने शेवाळेवाडी गावासाठी सुमारे 36 कोटी रुपयाची पाणी योजना सुरू केली आहे,संपूर्ण गावांमध्ये जवळजवळ 25 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे ,तसेच इंद्रप्रस्थ येथील मुख्य टाकी पासून पुणे सोलापूर रोडला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून ,आज पासून वीस लाख लिटर व दहा लाख लिटर अशा दोन टाक्यांचे काम सुरू झाले असून या टाक्यांचे काँक्रिटीकरण व पायाभरणी आज करण्यात आली, शेवाळेवाडी गावची लोकसंख्या सुमारे 50,000 असून पुढच्या 30 वर्षांचे नियोजन या योजनेमध्ये केले आहे, गावामध्ये एकूण 40 लाख लिटरच्या नवीन तीन टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे, तसेच अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे, पुढील एक वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून ,नागरिकांना अनेक वर्ष भेडसावनारा पाणी प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आला आहे, गेली अनेक वर्ष शेवाळेवाडी गावासाठी पुणे मनपाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, परंतु टँकरद्वारे मिळणारे पाणी हे अपुरे व नियमितपणे मिळत नसल्याने नागरिकांचे विशेषता महिला भगिनींचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते, ही योजना मंजूर करण्यासाठी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गावचे माजी उपसरपंच राहुल दादा शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, डिसेंबर 2024 मध्ये ही योजना मंजूर झाली होती, आज या योजनेला गती आली आहे,





