कॉलेजला जाते सांगून पुण्यातील तरुणी बेपत्ता; रात्री ई-मेल आला अन् कुटुंबीयांना धक्का!

Rokhthok Maharashtra 8 0

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली, रात्री ई-मेल केला अन् कुटुंबीयांना धक्का!
पुण्यातील हवेली तालुक्यातून 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही तरुणी बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी ती घरातून बाहेर पडली. मात्र, संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी तिचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, रात्री तरुणीने कुटुंबीयांना एक ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये तिने ‘मी एका तरुणासोबत पळून जात असून, त्याला एड्स असल्याचे माहीत असूनही मी त्याच्याशी लग्न करणार आहे,’ असा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.
हा ई-मेल पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी नेमकी कुठे आहे? ती कोणासोबत आहे? आणि ती सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
अखेर तरुणीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला आहे.
ई-मेलमध्ये उल्लेख केलेल्या तरुणासह विविध दिशांनी पोलिसांचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.