अभिनेता इमरान खानबाबत मोठी बातमी!* २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याचे वृत्त.

Rokhthok Maharashtra 9 0

अभिनेता इमरान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित या आंदोलनात इमरान खान सहभागी झाला होता. या आंदोलनातील त्याच्या सहभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.
आता मुंबई पोलिसांनी इमरान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्टच्या कलम ७ आणि २९ अंतर्गत कारवाई झाल्याचे वृत्त आहे.
इमरान खान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया अर्थात OCI कार्ड असल्याचे सांगितले जात आहे.
या कारवाईमुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, नोटीस आणि कारवाईबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.