वेल्हे परिसरात गोळीबाराची घटना!* जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप.

Rokhthok Maharashtra 6 0

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात जुन्या भांडणाच्या वादातून एका व्यक्तीवर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला वेल्हे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतलं आहे.
विजय मारुती वसवे, वय ४७ वर्षे, राहणार मौजे मालवली, असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. नसरापूर रोडवरील कारतुर्डेवाडी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. जुन्या भांडणाच्या वादातून ओंकार वाळू जाधव, राहणार मालवली, याने विजय बसवे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या घटनेत विजय वसवे, गंभीर जखमी झाले. त्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पाठीमध्ये अडकलेल्या गोळ्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आल्याचं पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी वेल्हे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत आरोपी ओंकार वाळू जाधव याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, ज्ञानदीप धिवार, सोमेश राऊत, अजय शिंदे, आकाश पाटील, राजेंद्र आवदे, शुभम कदम आणि अजय गार्डी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.