पुण्यात ५ अनधिकृत RMC प्रकल्पांवर हातोडा! बावधनमध्ये ३५ हजार चौ. फुटांचे बांधकाम जमीनदोस्त

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्याच्या आरोपांवरून पाच अनधिकृत रेडीमिक्स काँक्रीट अर्थात RMC प्रकल्पांवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
द मार्क इन्फ्रा, KEC इंटरनॅशनल लिमिटेड, DNV इन्फ्राकॉन LLP , यशाई इन्फ्रा आणि अल्ट्राटेक RMC या पाच प्रकल्पांवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी महावितरणच्या मदतीने संबंधित प्रकल्पांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तसेच ऑपरेटिंग रूमला टाळे ठोकण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी प्रदूषणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने ही मोहीम राबवली.
दरम्यान, यशाई इन्फ्रा कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास संबंधित पाडकामाला स्थगिती मिळाल्याचा दावा ॲड. जान्हवी भोसले आणि ॲड. भालचंद्र धापटे यांनी केला आहे. नोटीस देताना आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा आरोपही ॲड. भोसले यांनी केला.
ही कारवाई शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे, उपायुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पुण्यातील प्रदूषणाविरोधातील या कारवाईनंतर आता पुढे काय घडणार? पाहत राहा, रोखठोक महाराष्ट्र!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.