रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन
हीरक महोत्सवी वर्षानिमित्त
कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 9.30 रमेश वैशपायन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य मंडळ या सेवाभावी संस्थेची स्थापना ११ जून १९६० रोजी झाली. अथक परिश्रम, प्रयत्नांची पराकाष्ठा, विविध उपक्रम व प्रयोगशील कार्यामुळे इ.स. २०२० मध्ये संस्था यशस्वी वाटचाल करत ६० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरात आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते.
हडपसर परिसरातील शाळांमधून इ.१ ली व २ री या गटातून ४४ विद्यार्थी व इ. ३ री व ४ थी या गटातून ५५ विद्यार्थी अशा एकूण ९९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजयी विद्यार्थी –
अ. गट- प्रथम क्रमांक – वेदांत अशोक ढोले.
द्वितीय क्रमांक – गार्गी संतोष जुन्नरे
तृतीय क्रमांक – सुश्रुत साईनाथ चितळे
उत्तेजनार्थ – प्रांजली दादासो गारुडी , विराज ढिवरे
ब. गट- प्रथम क्रमांक – श्रेया विशाल जगताप.
द्वितीय क्रमांक – ओम पंडित मोरे.
तृतीय क्रमांक – ईश्वरी किसन कुंभार.
उत्तेजनार्थ – आर्शिया लतिफ शेख, साईना मनोहरबाबू रामरेड्डी
बक्षीस समारंभाचा कार्यक्रम प्रा.जे.पी. देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेचे संयोजन अनिल गुजर ( सचिव महाराष्ट्र आरोग्य मंडळ) सुरेश गुजर (मुख्याध्यापक सानेगुरुजी प्राथमिक विद्यामंदिर) व कळसे बाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचलन – शैलजा सनान्से यांनी केले व जयश्री पाटील यांनी आभार मानले
